in

सोनू सूदच्या घरी आयकर विभागाची पाहणी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयावर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. यामध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार आयटी विभागाने सोनूच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले कारण अभिनेत्याशी संबंधित अकाउंट्स च संदर्भात छेडछाड केली आहे. अहवालांनुसार, आयटी विभागाने सोनू आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित सहा ठिकाणांचे सर्वेक्षण केले आहे.

आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

तब्बल 20 तास सोनू सूदच्या घरी झाडाझडती सुरु होती. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी एक-एक करुन घरातून बाहेर पडले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Thane

भारताला दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून धडे घेण्याची गरज नाही; भारताकडून पाकिस्तानवर जोरदार टीका