in

‘टाइम’ची प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; पंतप्रधान मोदींसह ‘या’ मान्यवरांचा समावेश

टाइम साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या शंभर जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांचा समावेश आहे.

ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही तर त्या म्हणजेच पक्ष आहेत. रस्त्यावरची लढाई लढण्याची जिद्द व स्वकष्टाने मिळवलेले यश हे पुरुषी संस्कृतीला आव्हान देत उजळले आहे, असं टाइमनं म्हटलं आहे.

सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांच्याविषयी म्हटले आहे की, चाळीस वर्षीय पुनावाला हे जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करीत असून त्यांनी अत्यंत योग्य वेळी जगाला मदत केली. कोरोनाची साथ संपलेली नाही, पण ती संपवण्यात पूनावाला नक्की मदत करतील. लस असमानता गंभीर असून जगातील काही देशांकडे जास्त लस आहे तर काही देशात लशीचा तुटवडा आहे.

टाइमच्या यादीत टेनिसपटू नाओमी ओसाका, रशियातील विरोधी नेते अलेक्झी नवाल्नी, संगीतकार ब्रिटनी स्पिअर्स, आशियन पॅसिफिक पॉलिसी अ‍ॅण्ड प्लानिंग कौन्सिलच्या कार्यकारी संचालक मंजुषा पी. कुलकर्णी, अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक, जागतिक व्यापार संघटनेचे नेतृत्व करणारी पहिली कृष्णवर्णीय महिला नगोझी ओकोन्झो इवियला यांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारताला दहशतवादाचे केंद्र असलेल्या देशाकडून धडे घेण्याची गरज नाही; भारताकडून पाकिस्तानवर जोरदार टीका

‘…अन्यथा गावस्करांना दिलेला म्हाडाचा प्लॉट रद्द केला असता’