in , ,

कुख्यात गुंड गजानन मारणे तुरुंगातून सुटला; 500 हून अधिक गाड्या स्वागतासाठी

लोकशाही न्यूज नेटवर्क

कुख्यात गुंड गजानन मारणेची २ खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने सोमवारी सायंकाळी मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्यांची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात ५०० हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या.

काही दिवसांपूर्वीच येरवडा कारागृहाबाहेर फटाके फोडून एका गुंडाचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार घडला होता. आता त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात २०१४ मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले हाेते.

गजानन मारणे हा सोमवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी कारागृहाबाहेर आला. यावेळी कारागृहाबाहेर मोठा जमाव होता. त्यानंतर त्याच्या सर्व गाड्या एकामागोमाग एक्सप्रेस हायवेने पुण्याकडे रवाना झाल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरेमधील वृक्षतोडीला विरोध आणि दानापाणीत वृक्षतोड; शिवसेनेचं बेगडी पर्यावरणप्रेम उघड

टूलकिट प्रकरण : बीडपर्यंत धागेदोरे. शंतनू मुळूक यांच्या घराची झाडाझडती