in

IND vs ENG: भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर ऑंल आउट

लोकशाही न्यूज नेटवर्क | इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली. तसेच इंग्लंडने फॉलो-ऑनचा पर्याय नाकारत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिल्या डावात इंग्लंडने ५७९ धावसंख्या उभारली होती.या धावसंख्या पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज मोठी धावसंख्या न करता बाद झाले. तर चेतेश्वर पुजाराने ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. तर ऋषभ पंतने ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९१ धावा केल्या. त्यांच्यानंतर अश्विन ३१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १२ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ८५ धावा केल्या. त्यामुळे भारताला ३३७ धावांचा पल्ला गाठता आला.

भारतावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवणार होती, पण इंग्लंडच्या कर्णधाराने तो पर्याय नाकारत पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडला पहिल्या डावाअखेर २४१ धावांची मोठी आघाडी मिळाली.

इंग्लंड दुसऱ्या डावात फलंदाजी आल्यानंतर उपहाराच्या विश्रांतीआधी केवळ २ षटकं टाकण्यात आली. त्यात इंग्लंडला केवळ १ धाव करता आली तर अश्विनने डावाच्या पहिल्याच चेंडूवर रॉरी बर्न्सला शून्यावर माघारी धाडलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदी राज्यसभेत काय म्हणाले?

‘घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है’; राऊतांचा पुन्हा शाहंवर निशाणा