लोकशाही न्यूज नेटवर्क
चेन्नई येथे चेपॉक मैदानात सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एकापाठोपाठ एक खेळाडू तंबूत परतत असताना अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने शानदार शतक ठोकले. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद 286 धावा केल्या. आता फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर विजयासाठी 482 धावा करण्याचे आव्हान इंग्लंडसमोर आहे. या सामन्याचे अद्याप दोन दिवस बाकी आहेत.
कालच्या दुसऱ्या दिवशी शुबमन गिलला गमावल्याने भारताने आज 1 बाद 54 धावांवर डावाला सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा मैदानात उतरले. लीचच्या गोलंदाजीवर पुजारा धावबाद झाला. त्याने 7 धावा केल्या. आधीच्या डावात दीडशतकी खेळी करणारा रोहित शर्मा अपयशी ठरला. लीचच्या गोलंदाजीवर रोहित (26) यष्टिचित झाला. त्यापाठोपाठ ऋषभ पंत देखील मोठा फटका खेळण्याच्या नादात 8 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेलही तंबूत परतले.
त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन यांनी डाव सावरला. या जोडीने 96 धावांची भागीदारी केली. भारताने 200चा टप्पा ओलांडताच विराट (62 धावा) बाद झाला. मोईन अलीच्या गोलंदाजीवर तो त्याची विकेट पडली.
त्यानंतर अश्विनने कसोटीतील पाचवे शतक उर्वरित खेळाडूंच्या मदतीने भारताची धावसंख्या 286पर्यंत नेली. त्याने 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 106 धावा केल्या. भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा अश्विनच्या नावावर झाल्या आहेत. सिराज दोन षटकारांसह 16 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले.
Comments
Loading…