in

भारतीय क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात विलग करणार

Share

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ डिसेंबरपासून कसोटी मालिका रंगणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी अ‍ॅडलेड येथे दोन आठवडे विलगीकरण करणे अनिवार्य असेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी निक हॉक्ले यांनी जाहीर केले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने यांनी खेळाडूंना दोन आठवडे विलगीकरणाचा काळ निराशाजनक असल्याचे मत काही दिवसांपूर्वी व्यक्त केले होते. परंतु हॉक्ले यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे अन्य पर्याय नसल्याचे सांगतिले.

‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ करण्यापूर्वी दोन आठवडय़ांचे विलगीकरण भारतीय खेळाडूंसाठी बंधनकारक असेल. परंतु या कालावधीदरम्यान खेळाडूंसाठी पुरेशी सराव व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यांच्या आहाराचीही योग्य काळजी घेतली जाईल. खेळाडूंच्या आरोग्य सुरक्षेशी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून तडजोड केली जाणार नाही,’’ असे हॉक्ले म्हणाले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

गुरुनाथ सुभेदारची दुसरी गर्लफ्रेंड दिसते इतकी हॉट!

नालासोपारा रेल्वे स्थानकात नागरिकांनी लोकल रोखून धरली…