in

Ind Vs Eng : परतफेड… भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क

चेन्नईत भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवत विजय संपादन केला आहे. चेपॉकच्या चेपॉकच्या खेळपट्टीवर ४८२ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडच्या संघाचा धुव्वा उडाला आहे. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली आहे.

चेन्नई येथील चेपॉक मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. पदार्पणवीर अक्षर पटेल आणि अनुभवी आर. अश्विन यांच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. ४८२ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ १६४ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघानं दुसरा सामना ३१३ धावांनी जिंकला. या विजयासाह भारतीय संघानं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. पदार्पणवीर अक्षर पटेल यानं पाच बळी घेत दुसऱ्या डावात इंग्लंड संघाचं कंबरडं मोडलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत 26 वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

पोलिस हवलदार संतोष पाटील यांची आत्महत्या