कोरोना संकटाच्या काळात भारतानं अनेक देशांना मदत केली आहे. विविध देशांना भारतानं कोरोना लसींचा साठी पुरवला आहे. आता पाकिस्तानलासुद्धा भारत लस देणार आहे. पाकिस्तानला कोरोना लसींचे १.६ कोटी डोस देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनविण्यात आलेली ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाची लस पाकिस्तानला दिली जाणार आहे. ‘द ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्यूनायजेशन (GAVI) याद्वारे ही लस पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जगातील गरीब देशांना कोरोना लस पुरवण्यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत पाकिस्तानला लसीचं पहिलं पार्सल पोहोचेल.
पाकिस्तान सरकार इतर देशांच्या लसींच्या भरवशावर आहे. यापूर्वी चीननं पाकिस्तानला लस पुरवठा केला होता, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आलं होतं.
Comments
Loading…