लोकशाही न्यूज नेटवर्क | टीम इंडिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंडच्या 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
इंग्लंडच्या टी 20 मालिकेतील खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा इयन मॉर्गनच्या खांद्यावर असणार आहे. या टी 20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या पाचही सामन्यांचे आयोजन 1 दिवसाच्या अंतराने करण्यात आले आहे. पहिला सामना हा 12 मार्च रोजी असणार असून शेवटचा सामना 20 मार्च रोजी असणार आहे.
इंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.
Comments
Loading…