in

India vs England | भारत विरुद्ध इंग्लंडमध्ये शुक्रवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात

लोकशाही न्यूज नेटवर्क | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी, टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळण्यात येणार आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेला उद्या (5 फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे.या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया विरोधात नुकताच ऐतिहासिक विजय मिळवला आहे, यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुणावलेला आहे. यामुळे भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

इंग्लंडच्या भारत दौऱ्याचे मालिकानिहाय वेळापत्रक

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला कसोटी सामना : एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 5-9 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.
  • दूसरा कसोटी सामना : एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई | 13-17 फेब्रुवारी | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.
  • तिसरा कसोटी सामना : मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 24 ते 28 फेब्रुवारी | दुपारी 2 वाजून 30 मिनिटं.
  • चौथा कसोटी सामना : मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | 4 ते 8 मार्च | सकाळी 9 वाजून 30 मिनिटं.

टी 20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिली टी 20 सामना : 12 मार्च रोजी मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • दुसरा टी 20 सामना : 14 मार्च रोजी स्टेडियम, अहमदाबाद
  • तिसरा टी 20 सामना : 16 मार्च रोजी मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • चौथा टी 20 सामना : 18 मार्च रोजी मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • पाचवा टी 20 सामना : 20 मार्च रोजी मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना : 23 मार्च रोजी गहुंजे स्टेडियम, पुणे
  • दुसरा एकदिवसीय सामना : 26 मार्च रोजी, गहुंजे स्टेडियम, पुणे
  • तिसरा एकदिवसीय सामना : 28 मार्च रोजी गहुंजे स्टेडियम, पुणे

टीम इंडिया कसोटी संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

इंग्लंड संघ : जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जॅक लीच.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुढील प्रजासत्ताक दिनाची परेड राजपथावर नव्हे तर, ‘येथे’ होणार…

कंगनाला ट्विटचा दणका, आक्षेपार्ह ट्विट केले डिलीट