in

IND Vs ENG : तिसऱ्या दिवसाअखेर भारत ६ बाद २५७

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत आणि इंग्लंड यांदरम्यान चेन्नईत सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारत अद्याप ३२१ धावांनी पिछाडीवर आहे. इंग्लंडचा कप्तान जो रूटच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर संघाने ५७९ धावांचा डोंगर रचला. याचा पाठलाग करताना भारताच्या ऋषभ पंतचे शतक थोडक्यात हुकले. पंतने ८८ चेंडूत ९१ धावा काढल्या. तसेच तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत वॉशिंग्टन सुंदर ३३ तर आर, अश्विन ८ नाबाद आहेत.

चेतेश्वर पुजारा आणि पंत यांच्या संयमी भागिदारीमुळे भारताला २५७ धावा चोपता आल्या. पंतने आक्रमक खेळी करत डाव सांभाळला. मात्र शतकाच्या जवळ असताना त्याची विकेट पडली. त्यामुळे पंत आणि पुजाराची भागिदारी तोडण्यात फिरकीपटू बेसला यश आले. पुजारा यानेही डाव सांभाळत १४३ चेंडूत ११ चौकारांसह ७३ धावा केल्या. पंत आणि पुजारा यांनी ११९ धावांची भागिदारी केली. यामध्ये पंतने ९ चौकार आणि ५ षटकार मारले.

५७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे ७४ धावांत चार गडी माघारी परतले. यामध्ये विराट कोहली ११ अजिंक्य राहणे १ रोहित शर्मा ६ यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही.

इंग्लंडकडून फिरकीपटू डॉम बेस याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तसे जोफ्रा आर्चरने दोन बळी घेतले.
भारताच्या २५ व्या षटकात बेसने ऑली पोपकरवी विराटला बाद केलं. विराट बाद झाल्याने उपकर्णधार अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजाराला साथ देण्यासाठी मैदानावर आला आहे. पण तो फार काही खास करु शकला नाही. रहाणेला ६ चेंडूत १ धावांवर खेळत असताना बेसनेच झेलबाद केले.

इंग्लंड मजबूत स्थितीत

इंग्लंडने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कप्तान जो रूटने साजेशी खेळ करत ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. यामुळे इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअंती १९०.०१ षटकांत ५७८ धावांचा डोंगर उभारला. याचसोबत बेन स्टोक्स ८२ तर सीब्लीने ८७ धावा ठोकल्या. यामुळे भारतासमोर मोठे आव्हान आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

शेतकरी आंदोलनाचे गांभीर्य केंद्र सरकारला कळायला हवे : शरद पवार