सर्वाधिक लसीकरणाच्या आकडेवारीत जागतिक स्तरावर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारताचा क्रमांक आहे. आज (18 फेब्रुवारी) सकाळी 8 वाजेपर्यंत 94 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियानाअंतर्गत लस घेतली.
आतापर्यंत 1 लाख 99 हजार 305 सत्रांत 94 लाख 22 हजार 228 जणांनी लस घेतली आहे. यामध्ये 61 लाख 96 हजार 641 आरोग्य कर्मचारी (पहिला डोस), 3 लाख 69 हजार 167 आरोग्य कर्मचारी (दुसरा डोस) आणि 28 लाख 56 हजार 420 फ्रंटलाइन वर्कर्स (पहिला डोस) यांचा समावेश आहे.
कोविड -19 लसीकरणाची दुसरा डोस देण्यास 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेल्यांना हा दुसरा डोस देण्यात येत आहे. 2 फेब्रुवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्सच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरण अभियानाच्या 33व्या दिवशी (18 फेब्रुवारी) 4 लाख 22 हजार 998 लाभार्थींचे 7 हजार 932 सत्रांत लसीकरण झाले. यापैकी 3 लाख 30 हजार 208 लाभार्थ्यांना 10 हजार 574 सत्रांत पहिला डोस आणि 92 हजार 790 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. दुसरा डोस घेतलेल्यांपैकी 58.20 टक्के लोक 7 राज्यांमधील आहेत. एकट्या कर्नाटकमध्ये 14.74 टक्के आहेत.
Comments
Loading…