in ,

कोविड-१९: गरिबांसाठी ६५ हजार कोटींची गरज – रघुराम राजन

Share

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. भारताने कोरोना आणि डळमळत्या अर्थव्यवस्थेचा सामना कसा करावा याबाबत राहुल गांधी यांनी रघुराम राजन यांना प्रश्न विचारले,  त्यावर रघुराम राजन यांनी सूचक उत्तर दिली. अमेरिकेपेक्षा भारताला कोरोनाच्या चौपट टेस्ट करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. लॉकडाऊन हटवण्यासाठी २० लाखांहून अधिक टेस्ट होणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

लॉक डाऊनमुळे गरिबांसमोरील समस्या वाढल्या आहेत. त्यांच्यासाठी सरकारला ६५ हजार कोटी रुपये खर्च करण्याची गरज आहे, असं आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज सांगितले. जागतिक महामारीचा फायदा कुठल्याही देशाला होत नसतो. मात्र काही देशांना कोरोनानंतर पुढे जाण्याची संधी आहे. भारताला देखील अधिक वाव आहे. भारत आपले वेगळे स्थान निर्माण करू शकतो. पण यासाठी भारताने उद्योगधंदे, सप्लाय चेन,  इंडस्ट्रीवर भर दिला पाहिजे. तसेच मनरेगा सारख्या विविध योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याचबरोबर मास टेस्टिंग नंतरच ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो, असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईच्या ‘या’ शाळांमध्ये CBSE, ICSE चे ऑनलाईन प्रवेश सुरु

कोरोनाचं मृत्यू तांडव! आतापर्यंत २,२८,३९४ जणांनी गमावला जीव