in

IND Vs ENG: भारतासमोर ३८१ धावांचं आव्हान… सामना निर्णायक टप्प्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये दिलेल्या ४२० धावसंख्येचा पाठलाग करताना सामना रंगतदार स्थितीत पोहोचला आहे. रोहित शर्माला माघारी पाठवल्यानंतर भारतीय संघाला अद्याप ३८१ धावांची गरज आहे. आज चौथ्या दिवसाअखेर भारताने एका गड्याच्या मोबदल्यात ३९ धावांची मजल मारली. आता तिसऱ्या टप्प्यात भारताला धावांचा डोंगर उभारावा लागणार आहे. उद्या सामन्याचा शेवटचा दिवस असल्याने ३८१ धावांचे लक्ष्य टीम इंडियासमोर आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी शुबमन गिल १५ आणि चेतेश्वर पुजारा १२ धावांवर नाबाद होते.

पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंडने फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखण्यात आलं. दोन्ही डावांत इंग्लंडकडे ४१९ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघानं २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघानं पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे. दिग्गज फलंदाजाच्या साथीला शुबमन गिल, पंत आणि सुंदर यासारखे नवखे फलंदाजही आहेत. पंतने भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये ९१ धावा फटकारल्या होत्या. त्यामुळे उद्याचा दिवस निर्णायक असणार आहे.

२०२१ वर्षाच्या सुरुवातीला गाबा कसोटी सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला होता. तर २००८ मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकरच्या शतकी खेळीच्या बळावर ३८७ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाकडे लक्ष असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

114 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत… दुसऱ्या डावात अश्विनचे सहा बळी

ही पाहा, मोदींनी उल्लेख केलेली नवीन ‘आंदोलनजीवी’ जमात, राष्ट्रवादीचा पलटवार