in

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला अमेरिकेत परवानगी नाकारली

भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच एक निराशाजनक वृत्त समोर येत आहे. अमेरिकेत भारत बायोटेकच्या लसीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी मिळू शकलेली नाही. तरी भारतात कोवॅक्सिन लस पूर्ण क्षमतेने देण्यात येत आहे. अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन अर्थात एफडीएने भारत बायोटेकच्या कोविड लसीच्या आपात्कालीन वापरासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे अमेरिकेत कोवॅक्सिनच्या लॉन्चिंगसाठी विलंब होणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन निर्मितीसाठीच्या अमेरिकेतील भागीदार ओक्युजेनने अमेरिकेतील एफडीएकडे पास मस्टर फाईल पाठवून कोवॅक्सिनच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती.

अमेरिकेने आपात्कालीन मंजुरी नाकारल्यानंतर ओक्युजेनच्या वतीने म्हटलं की, कोवॅक्सिनच्या वापरासाठी आता कंपनी संपूर्ण मंजुरीसाठी प्रयत्न करेल. अमेरिकेच्या एफडीएने कंपनीला लसीचे आणखी एकदा परिक्षण करण्याची सूचना केली आहे. जेणेकरून कंपनी बायोलॉजिकल परवान्यासाठी अर्ज करू शकले.

सध्या भारत बायोटेक कोव्हॅक्सिन लसीचे फेज-३ क्लिनिकल ट्रायल करत आहे. त्यांनी बुधवारी सांगितले की, याचा डाटा जुलैमध्ये जाहीर करू. ज्यानंतर कंपनी लसीच्या संपूर्ण परवान्यासाठी अर्ज करेल. पण सध्या कोव्हॅक्सिनला परदेशात मान्यता मिळविण्यात अडचणी येत आहेत, कारण जागतिक आरोग्य संघटनेला मंजूरीसाठी फेज-३चा डाटा पाहिजे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation: “संभाजीराजे माझे बंधूच, हे त्यांचेच घर कधीही यावं”

IAS Sanjeev Jaiswal; महाराष्ट्रात आणखीन एक लेटर बॉम्ब; आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप