in ,

Coronavirus ;कोरोनाचा कहरच; आता रशियाला भारताने टाकले मागे

Share

देशात कोरोना विषाणूने थैमान घालून ठेवले आहे. या थैमानामुळे आता देशात कोरोना रुग्णांचा आकडा इतका वाढू लागला की भारत आता सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.त्यामुळे जर आगामी काळात हा आकडा रोखता आला नाही तर या विषाणूपासून सावरणे आणखीन अवघड बनणार आहे.

भारतात, कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जगातील कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. याबाबतीत रविवारी भारताने रशियाला मागे टाकले आहे. जगभरात सध्याच्या घडीला सर्वाधिक कोरोना संसर्गाची रुग्ण महासत्ता असलेलया अमेरिकेत आहेत. या देशात 29 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यानंतर ब्राझील, भारत आणि रशियाचा नंबर लागतो.ब्राझीलमध्ये 15 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेत भारताच्या चार पट जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. ब्राझीलमध्ये भारतात जवळपास दुप्पट प्रकरणे आहेत. मृत्यूच्या बाबतीतसुद्धा जगात अमेरिका आणि ब्राझीलची अवस्था सर्वात वाईट आहे.

भारतात सध्या 697,836 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. रविवारी भारतात सलग दुसर्‍या दिवशी सर्वाधिक कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद झाली. याच रुग्णांमुळे भारताने रशियाला मागे टाकले आहे. त्याचबरोबर भारत आता 7 लाख रुग्णसंख्येच्या जवळ आहे. भारतासाठी हा आकडा भीषणावह आहे. त्यामुळे या विषाणूला न रोखलयास आणखीन महामारी पसरण्याची भीती आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबईतील 3 वॉर्डमध्ये सेरो सर्व्हे होणार; पाहा काय आहे, सेरो सर्व्हे!

राशिभविष्य- रविवार 5 जुलै ते शनिवार 11 जुलै 2020