in

Ind vs NZ 1st Test | चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची 1 बाद 4 धावा, 284 धावांचं लक्ष्य

भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सूरू असलेला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलाआहे. न्यूझीलंडसमोर 284 धावांचं लक्ष्य असून चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची 1 बाद 4 धावा अशी अवस्था आहे. तर भारताला 9 विकेट्सची आवश्यकता आहे.

कसोटीच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने भारताला 345 धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर न्यूझीलंडला 142.3 षटकांमध्ये सर्वबाद 296 धावांवरपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने 7 बाद 234 धावांवर आपला डाव घोषित केला आहे आणि न्यूझीलंडला विजयासाठी 283 धावांचं लक्ष्य दिलं आहे.

दरम्यान, दिवसाची अवघी 4-5 षटकं बाकी असताना भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने भारताचा डाव घोषित केला आणि त्याचं फळ भारताला मिळालं आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 4 षटकात एका विकेटच्या बदल्यात 4 धावा जमवल्या आहेत. त्यामुळे आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 9 विकेट्सची तर न्यूझीलंडला 279 धावांची आवश्यकता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Employee Strike | एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण…,अजित पवार म्हणाले

Omicron Variant : ‘लॉकडाऊन नको असेल तर बंधने पाळा’, मुख्यमंत्र्यांचं आवाहन