in

Omicron Corona | क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर; नव्या व्हेरियंटचा मुंबईच्या टेस्ट मॅचवर परिणाम होणार नाही

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे संपुर्ण जग हादरले आहे. पुन्हा लॉकडाऊनची नामुष्की अनेक देशांवर आली आहे. तसेच भारतात सुद्धा कठोर नियमावली आखण्यात आली. भारतीय दौर्यावर सध्या न्यूझीलंड असून कसोटी सामने सूरू आहेत. या सामन्यांवर या नव्या व्हेरियंट सावट असणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा दिवस असून विजेता ठरणार आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. 3 ते 7 डिसेंबरला हा सामना होणार आहे. या सामन्यावर नव्या व्हेरियंट सावट असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र या कसोटी मालिकेवर या नव्या व्हेरियंटचा परिणाम होणार नाही आहे. 3 ते 7 डिसेंबरला हा सामना होणार नसून वेळापत्रकात कुठलाच बदल केला जाणार नाही आहे.तसेच कोविड नियमांचे पालन करून हा सामना होणार आहे. वानखेडेच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के म्हणजेच जवळपास साडेसात हजार जणांना मॅच पाहता येणार असल्याची माहीती खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे.

विराट कोहलीचं संघात पुनरागमन

विराट कोहलीने कानपूरच्या पहिल्या कसोटीत त्याने विश्रांती घेतली होती. पण दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासमोर प्रश्न असा आहे की, विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यासाठी संघातील कोणत्या खेळाडूला बाहेर बसवलं जाणार? चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोन वरिष्ठ खेळाडू फॉर्मशी झगडत आहेत, अशात विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे विराटच्या जागेची गुंतागुंत वाढली आहे. तसेच, भारतीय संघ पाचपैकी एकाही गोलंदाजाला वगळू शकत नाही. अशा परिस्थितीत मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यापैकी एकाला बाहेर जावे लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दोन्ही सभागृहांमध्ये कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर

कोल्हापूरात नवजात अर्भकाला पोत्यात गुंडाळून फेकलं