in

IND vs ENG : पंत-पुजरा यांच्यावर भारतीय संघाची मदार

लोकशाही न्यूज नेटवर्क

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिली कसोटी खेळण्यात येत आहे. ऋषभ पंत आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाचा डाव सावरला आहे. विराट कोहली (११), अजिंक्य राहणे (१) आणि रोहित शर्मा (६) यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयश आलं.

ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद ८१ धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. चहापानापर्यंत भारतीय संघानं पहिल्या डावात ४ गड्यांच्या मोबदल्यात १५४ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप ४२४ धावांनी पिछाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा ५३ धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंत ५४ धावांवर खेळत आहे. पंतनं ४४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि चार षठकाराच्या मदतीनं ५४ धावांचा पाऊस पाडला.

५७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचा ७४ धावात चार गडी तंबूत परतले होते. अशा परिस्थितीत पंत-पुजारा जोडीनं भारतीय संघाचा डाव सावरला. युवा शुबमन गिल यानं २९ धावांची छोटेखानी खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर आणि डॉम बेस यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी मिळवले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदी आसाम, पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर…निवडणुकांमुळे मोठ्या घोषणांची शक्यता

उत्तराखंडमधील दुर्घटनेत १००-१५० जण वाहून गेल्याची भीती…रेस्क्यू ऑपरेशन सुरू