इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने नुकतीच संघाची घोषणा केली आहे.
तिसरा कसोटी सामना २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अहमदाबादला होणार आहे. हि तिसरी कसोटी दिवस रात्र पद्धतीची असणार आहे. गुलाबी चेंडूने ही कसोटी खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत करत ४ कसोटींच्या मालिकेत भारताने विजयासह १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान विश्व अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला पुढील दोनही कसोटी सामने महत्त्वाचे आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर होते. पण तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत या दोघांचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र या दोघांना संघात स्थान मिळाले नाही आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभ्मान गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), के.एल.राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, साहा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, सुंदर, जसप्रीत बुमराह , इशांत शर्मा, मोहम्मद सिराज.
Comments
Loading…