in

IND vs ENG | पहिला दिवशी कर्णधार रूटचे दमदार शतक

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या संघाने ३ बाद २६३ धावांपर्यंत मजल मारत खेळावर पूर्ण वर्चस्व राखलं आहे. इंग्लंडने दिवसखेर 89.3 षटकांमध्ये 3 विकेट्स गमावून 263 धावा केल्या. यामध्ये कर्णधार जो रुटने शानदार कामगिरी केली. रुटने आपल्या 100 व्या कसोटीमध्ये शानदार शतक लगावले. तर डोमिनिक सिब्लीने 87 धावांची खेळी केली. तर सलामीवीर रॉरी ब्रन्सने 33 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा जो रुट 128 धावांवर नाबाद होता. 

जवळपास वर्षभराने भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीला शुक्रवारी सुरूवात झाली. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रॉरी बर्न्स आणि डॉम सिबली यांनी अत्यंत संथ सुरूवात केली. काही वेळाने अश्विनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न करताना रॉरी बर्न्स झेलबाद झाला. त्याने ६० चेंडूत ३३ धावा केल्या.

त्यानंतर नवखा डॅन लॉरेन्स धावांचं खातंही उघडू शकला नाही. पाचव्या चेंडूवर त्याला बुमराहने पायचीत केले. पण त्यानंतर पहिलं सत्र आणि दुसरं संपूर्ण सत्र सिबली-रूट जोडीने खेळून काढलं. रूटने दमदार शतक झळकावलं तर सिबलीने आपली लय कायम राखत त्याला साथ दिली. रूट-सिबलीने २०० धावांची भागीदारी केली. परंतु दिवसाचा खेळ संपण्यासाठी काहीच चेंडू शिल्लक असताना सिबली १२ चौकारांसह ८७ धावांवर पायचीत झाला आणि खेळ थांबवण्यात आला. जो रूट १४ चौकार आणि १ षटकारासह १२८ धावांवर खेळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवाच्या नावाने पैसा गोळा करणारी भाजपा बेशरम…

Farmers Protest: ‘ही’ तीन राज्ये सोडून उद्या देशात होणार चक्का जाम आंदोलन