in

लॉकडाऊन काळात मुंबईत बेकायदा बांधकामांत भर

गेल्या वर्षभरात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी आल्या, कितीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पालिकेकडून घेतली आहे. पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात ऑनलाइन प्रणालीवरील २५ मार्च २०२०पासून २८ फेबुवारी २०२१पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. पालिका दरवर्षी सुमारे १५ हजार अवैध बांधकामांना नोटिसा देते तसेच कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तापोटी २० कोटी रुपये खर्च होतात. मात्र प्रत्यक्षात कारवाई वीस टक्क्यांपेक्षा अधिक बांधकामांवर देखील होत नाही, अशी माहिती शकील शेख यांनी दिली.

मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पालिकेकडे अवैध बांधकामांच्या तब्बल १३ हजारांहून अधिक तक्रारी आल्या असून साडेनऊ हजार अवैध बांधकामांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त ४६६ बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे.

कुर्ला, गोवंडी, मानखुर्दमधून सर्वाधिक तक्रारी

पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून अवैध बांधकामांच्या सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत. सुमारे १२०० ते ३२५० इतके हे प्रमाण आहे. कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड भागात सर्वांत जास्त अवैध बांधकामे आहेत. फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे. या भागात गेल्या दोन वर्षांत मुंबईतील सर्वाधिक आगी लागल्या आहेत. गोवंडी, मानखुर्द ही धारावीनंतरची दाट लोकसंख्येची झोपडपट्टी असून अवैध झोपड्या आणि नळ जोडण्या यांच्या अधिक तक्रारी पालिकेला या परिसरातून येतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत पाकिस्तानला देणार कोविशिल्ड लस

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण : मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल