in

कोरोना लसीचा पुरवठा वाढवा; गिरीश बापट यांचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी गिरीश बापट यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीचा पुरवठा वाढवा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे. त्याशिवाय 30 वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

राज्यात कोरोनाचा उद्रेक

राज्यात काल दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण आढळून आले आहेत. काल नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

28 फेब्रुवारीला पहिल्यांदा घराबाहेर…; अनिल देशमुखांनी आरोपांवर केला खुलासा

उलट नवनीत राणाच सगळ्यांना धमकावत असतात; अरविंद सावंतांनी फेटाळला आरोप