in

गणपतीसाठीच्या विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ

राज्यात गणेश उत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांच्या कालावधीत वाढ केला आहे. रेल्वेने खाली दिलेल्या तपशीलांनुसार गणपती विशेष गाड्यांचा विशेष शुल्कसह विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 01261 ​​पनवेल – चिपळूण विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 01262 चिपळूण – पनवेल विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

01257 लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आले आहे. 01258 सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

01259 पनवेल – सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे. 01260 सावंतवाडी रोड – पनवेल विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Badlapur

Chiplun nayshi