in

औरंगाबादेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Share

औरंगाबादमध्ये 90 वर्षीय वृद्ध सासूला जंगलातील नाल्यांमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सुनेनेच हा प्रताप केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस स्थानकामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असून संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कच्ची घाटी व पिरवाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलामध्ये 3 ऑगस्ट रोजी चिकलठाणा पोलिसांना 90 वर्षीय वृद्ध महिला जंगलातील नाल्यांमध्ये पडलेली आढळली. यावेळी पोलिसांनी त्या वृद्ध महिलेला नाल्यातून बाहेर काढत तिला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. यांनतर तिच्या कुटुंबियांचा तपास करण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान असे निदर्शनास आले की ही वृद्ध महिला ही मुकी आणि बहिरी असल्याचे समोर आले आहे. भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती. परंतु लॉकडाऊन मध्ये या वृद्ध महिलेला उपासमारीचे दिवस सहन करावे लागत होते. अशातच या वृद्ध महिलेच्या मावस सुनेने या वृद्ध सासूला जंगलामध्ये फेकून दिले होते. औरंगाबाद येथे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस हा प्रकार आला आहे. औरंगाबाद येथील चिकलठाणा पोलिस स्थानकामध्ये या गुन्ह्याची नोंद झाली असून संबंधित नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

mns

गणेशोत्सवासाठी मुंबईतून मनसेने सोडल्या विशेष बस

Anil Deshmukh Sushant Singh Rajput

सुशांतच्या केसचा तपास सीबीआय करणार की नाही, ११ तारखेला ठरणार