in

उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्यांसमोर भाजपा कार्यकर्त्याने गोळ्या घालून केली हत्या

Share

उत्तर प्रदेशात वाद झाल्याने एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकांनांसंबंधी बैठक सुरु असताना वाद निर्माण झाला आणि त्यानंतर हा प्रकार घडला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.

भाजपा कार्यकर्ता धिरेंद्र सिंह याने जयप्रकाश यांची गोळ्या घालून हत्या केली. धिरेंद्र सिंह भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. गोळीबार झाल्यानंतर घटनास्थळी एकच धावपळ सुरु झाली होती.
रेशन दुकानांच्या वाटपासाठी बैठक बोलावण्यात आली होती. पण सदस्यांमध्ये असलेल्या वादामुळे अधिकाऱ्यांनी बैठक रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी वाद निर्माण झाला आणि गोळीबार करण्यात आला अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली आहे. एका तंबूत सुरु असलेल्या या बैठकीसाठी प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पीडित व्यक्तीच्या भावाने केलेल्या तक्रारीनंतर १५ ते २० जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. दरम्यान योगी आदित्यनाथ यांनी उपविभागीय दंडाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि काही इतरांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे.

अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अशी माहिती गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश कुमार अवस्थी यांनी दिली आहे. दरम्यान कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी गावात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

1 नोव्हेंबरपासून बदलणार LPG सिलेंडरच्या home delivery ची सिस्टम

Navratri Garba : PPE किटपासून विद्यार्थ्यांनी तयार केला अनोखा ड्रेस