in ,

राज्यात आज 2 हजार 487 नवे कोरोनाबाधित, 89 रुग्णांचा मृत्यू

Share

मुंबई: राज्यात आज 1248 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 29 हजार 329 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 2487 नवे कोरोनाबाधित सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार 655 वर गेली आहे. तर राज्यात आज 89 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 2286 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात 36 हजार 31 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात 89 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- 70 (मुंबई 52, ठाणे 5, नवी मुंबई 9, कल्याण डोंबिवली 4), नाशिक- 6 (मालेगाव 6), पुणे- 11 (पुणे 9, सोलापूर 2), लातूर-1 (उस्मानाबाद 1), अकोला-1(यवतमाळ 1). आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष तर 43 महिला आहेत.

आज नोंद झालेल्या 89 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 47 रुग्ण आहेत तर 35 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 जण 40 वर्षांखालील आहे. या 89 रुग्णांपैकी 56 जणांमध्ये ( 63 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 2286 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 39 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 27 एप्रिल ते 27 मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील 50 मृत्यूंपैकी मुंबई 27, नवी मुंबई -9, मालेगाव -6,कल्याण डोंबिवली -4, ठाणे -3, सोलापूर- 1 असे आहेत.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात 11.7 दिवस होता तो आता 17.5 दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 15.7 दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( Recovery Rate) 43.35 टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर 3.37 टक्के आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 67 हजार 655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 44 शासकीय आणि 34 खाजगी अशा 78 प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष 3585 एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण 2722 एवढे आहे.

राज्यात 5 लाख 58 हजार 100 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये 72 हजार 704 खाटा उपलब्ध असून सध्या 34 हजार 480 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

SPECIAL REPORT | लॉकडाऊनच्या काळात गृहीणीने घेतलीयं अशी झेप…

Wajid Khan Passes Away : बॉलिवूडला धक्का; प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचे निधन