in ,

देशात ३९,९८० जण कोरोनाग्रस्त, १३०१ रुग्णांनी गमावला जीव

Share

नवी दिल्ली: देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन ३ ची घोषणा करण्यात आलीय. दोन लॉकडाऊनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडलीय. आतापर्यंत देशात ३९,९८० जणांना कोरोनाची लागण झालीय. त्यापैकी २८,०४६ जणांवर देशभरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. आतापर्यंत १०,६३३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तर कोरोनामुळे १३०१ जणांनी जीव गमवलाय. अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलीय.

देशभरात खबरदारीचे सगळे उपाय योजले जात आहेत. लॉकडाउन १७ मेपर्यंत वाढवण्यात आला असला तरीही ग्रीन झोनमध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळा असं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्यांमध्ये जे अडकलेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना त्यांच्या गावी जाता यावं म्हणून बस सेवा सुरु करण्यात आली आहे. काही विशेष ट्रेनही सोडण्यात आल्या.

बाहेर पडताना मास्क लावा, बाहेरून घरी आल्यावर हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा अशी आवाहनं करण्यात आली आहेत. तसंच जिथे कोरोनाचा रुग्ण सापडतो तो भाग तातडीने सील करण्यात येतो. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करुन त्यांना अलगीकरण किंवा विलीगकरण करण्याचा सल्लाही दिला जातो आहे. सर्वतोपरी खबरदारी घेऊनही रुग्णसंख्या वाढते आहे. त्याचमुळे लॉकडाउनचा कालावधीही वाढवण्यात आला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Video; भारतीय नौदलांकडून कोविड योद्ध्यांना मानवंदना

‘ग्रीन झोन’मध्ये कोरोनाचा शिरकाव! चंद्रपुरात आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण