in

आज कोरोनाचा कहर; एका दिवसात 10 हजार 576 नव्या रुग्णांची नोंद, तर मृत्यूंचाही आकडा वाढला

In one day, 10 thousand 576 new patients were registered and the number of deaths also increased
In one day, 10 thousand 576 new patients were registered and the number of deaths also increased
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे, त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 3 लाख 37 हजार 607 वर पोहोचला आहे. त्यातील अॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या ही 1 लाख 36 हजार 680 इतकी आहे तर आतापर्यंत महाराष्ट्रातील 1 लाख 87 हजार 769 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

आज राज्यात 10 हजार 576 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे ही राज्यासाठी चिंताजनक जरी गोष्ट असली तरी राज्यात टेस्टिंगचं प्रमाण वाढवल्याने हा आकडा समोर येत असल्याचे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. मागील 24 तासात राज्यात एकूण कोरोनामुळे 280 जणांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोनावर मात केलेल्या 5 हजार 552 जणांना घरी पाठवण्यात आलं आहे.

आतापर्यंत संपुर्ण राज्यात 16 लाख 87 हजार 213 इतक्या कोरोना संदर्भातल्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यामुळे संपुर्ण देशभारत सर्वाधिक चाचण्या करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे आरोग्यमंत्री राजेशे टोपे यांनी म्हटलं आहे.

सध्यस्थितीला राज्यात 8 लाख 58 हजार 121 जण होमक्वारंटाईन आहेत, तर 44 हजार 975 जण संस्थात्मक क्वारंटाईन असल्याची माहिती एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Narendra Modi

Narendra Modi at India Ideas Summit : शेतीत इन्व्हेस्ट करण्याची ही सगळ्यात मोठी संधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Video;वसईत परदेशी पक्ष्यांचे आगमन