आधीच गारपीटीनेत्रस्त शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सटाण्याच्या भाजपा आमदाराला केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. वीजजोडणी सुरू केल्यानंतर या आमदाराचाी मुक्तता करण्यात आली.
सटाण्याच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भाजपाचे आमदार दिलीप मंगळू बोरसे या नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी गेले होते. आधीच निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे संतप्त जालेल्या शेतकऱ्यांनी आमदार बोरसे यांना केरसाणे ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.
जोपर्यंत शेतीसाठी लागणारे वीज कनेक्शन पुन्हा जोडले जात नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर पडू देणार नाही, असा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला.. महावfतरणच्या आडमुठ्या धोरणाचा यावेळी ग्रामस्थांनी निषेध केला. तर, बोरसे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातूनच तातडीने चक्रे फिरवीत तात्काळ विजजोडणी करा, असे आदेश दिल्यानंतर महावितरणने वीजजोडणी सुरू केल्यानंतर ग्रामस्थांनी आमदार दिलीप बोरसे यांना ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर सोडले..
Comments
Loading…