in ,

गोव्यात शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार – संजय राऊत

गोव्यात पुढील वर्षी मार्च महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवसेना स्वबळावर 25 जागा लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत गोवा दौऱ्यावर असून त्यांनी काल आणि आज पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक संबधी चर्चा केली.

“गेल्या वेळी मगो आणि गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. युती मध्ये फक्त 3 जागा आम्हाला मिळाल्या होत्या. युती झाली की मर्यादा येतात.त्यामुळे पक्ष विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याने यावेळी आम्ही स्वबळावर 25 जागा लढवण्याचे ठरवले आहे. ” अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.

भ्रष्टाचारामुळे गोव्याचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गोव्याच्या बजेट पेक्षा देखील हा आकडा मोठा असून सरकार त्याकडे करत असलेले दुर्लक्ष गंभीर आहे. शिवसेना विधानसभेत गेल्या नंतर कॅसिनो उद्योगाला शिस्त लावेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

९ एप्रिलपासून IPL २०२१ला सुरुवात

ममता बॅनर्जींकडून बंगालच्या जनतेचा विश्वासघात, पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल