in

10 महिन्यात देशातील 10 हजार 113 कंपन्यांना लागलं टाळं

देशामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्याची माहितीसमोर आली आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद झाल्यात.

कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे.

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे असणाऱ्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या आहेत. कलम २४८ (२) चा अर्थ या कंपन्यांविरोधात सरकारने कोणतीही दंडात्मक कारवाई करुन त्या बंद न करता कंपन्यांनी स्वत:हून आपले उद्योगधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आकडेवारीसंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

सोमवारी लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या असंही ठाकुर यांनी स्पष्ट केलं. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रणबीर कपूरला कोरोनाची लागण!

नाशिकमध्ये ‘वीकेण्ड’ लॉकडाऊन; सातच्या आत घरात जाण्याचे आवाहन