in

पाकिस्तानमधील सिनेट निवडणुकीत इम्रान खान यांना झटका, मंत्री अब्दुल हफीज शेख पराभूत

पाकिस्तानातील इम्रान खान सरकारला जोरदार झटका बसला आहे. सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रभावाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इम्रान खान यांनी पंतप्रधानपद सोडावे, अशी मागणीही आता पुढे येऊ लागली आहे.

पाकिस्तानात अलीकडेच पार पडलेल्या वरिष्ठ सभागृहाच्या (सिनेट) निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात इम्रान खान यांच्या पीटीआयला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी, माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सिनेट निवडणुकीमध्ये युसूफ रझा गिलानी यांनी इस्लमाबादमधून विजय मिळवला आहे. गिलानी यांचा हा विजय इम्रान खान आणि त्यांच्या पीटीआय पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, गिलानी यांनी या निवडणुकीमध्ये इम्रान खान यांच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री डॉक्टर अब्दुल हफीज शेख यांना पराभूत केले आहे. मात्र या पराभवाबरोबरच पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. इम्रान यांचे निकटवर्तीय असणाऱ्या अब्दुल हफीज शेख यांचा पराभव इम्रान खान यांच्यासाठी लाजिरवाणी बाब आहे. आपल्या सहकाऱ्याच्या विजयासाठी इम्रान खान यांनी फार प्रयत्न केले होते. मात्र तरीही शेख यांना पराभव पत्करावा लागला.

शनिवारी विश्वासदर्शक ठराव
सिनेट निवडणुकीत बसलेल्या या झटक्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इम्रान खान विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहेत. त्यासाठी नॅशनल असेंब्लीचे अधिवेशन बोलावण्यात आल्याचे पाकिस्तानचे विज्ञानमंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बाबरी मशिदीबद्दलच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीमध्ये नाराजी

केरळमध्ये भाजपाकडून ई. श्रीधरन मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार!