in ,

दहावी, बारावी परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाची बातमी…

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन स्वरूपात मार्चमध्ये घेण्याची तयारी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केली जात आहे.याबाबत सविस्तर प्रस्ताव सरकारकडे सादर केला असून, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून त्याला मान्यता मिळाल्यास पुढील आठवड्यात दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

मार्च २०२२ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असून, या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे मंडळाने यापूर्वीच जाहीर केले आहे. मंडळाने परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक तयार करून नुकतेच ते शिक्षण विभागाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने मान्यता दिल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी भूमिका राज्य मंडळाने मांडली आहे. या प्रस्तावानुसार फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात याव्यात, असे सुचविण्यात आले आहे.फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षा, तर मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून दहावीच्या परीक्षा घेण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे. या दोन्ही परीक्षांसाठी प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षांचे वेळापत्रक सादर करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळातील सूत्रांकडून मिळाली आहे.

What do you think?

-14 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरणासाठी स्व:ता जिल्हा शल्यचिकित्सक रस्त्यावर; लसीकरण असेल तरच माजलगाव शहरात एंट्री

समीर वानखेडे प्रकरणावरून प्रकाश आंबेडकरांनी लगावला टोला