in ,

मुंबईत BEST बसने प्रवास करायचा असेल, तर लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

 दक्षिण आफिक्रेत आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांना आजपासून लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. लोकलनंतर आता बेस्टमध्येही प्रवास करायचा असल्यास लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक करण्यात आले आहे. लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवस झाले असतील, तरच बेस्ट बसमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. याशिवाय मास्क वापरणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकल रेल्वे, बेस्ट बस, राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस, मेट्रो, मोनो रेलसह स्थानिक परिवहन सेवांच्या बसमध्ये लसीकरण झालेल्यांनाच मास्कसह प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर बेस्ट प्रवाशनानेही लसीकरण सक्तीचं केलं आहे. त्यामुळे आजपासून बेस्टमध्ये प्रवास करायचा असल्यास लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवा.

बेस्ट प्रशासनाने सांगितलं की, ‘मुंबईत अनेक ठिकाणी बस सुरु होण्याआधीच प्रवाशांना तिकिट दिलं जातं. तिकिटं देताना आजपासून लसीकरण प्रमाणपत्र पाहिलं जाईल. सर्वांना कोविन अॅपवर लस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळेल. त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. ‘

रुमाल म्हणजे मास्क नाही, रुमालाचा वापर मास्क म्हणून केल्यास 500 रुपयांचा दंड लागणार; राज्य सरकारची नवी नियमावली – 

लसीकरण न केलेल्या प्रवाशांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे तर विना लसीकरण प्रवास करत असल्यास वाहक किंवा चालक यांना 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. तर खाजगी वाहक कंपनी मालकाकडून 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यातील दुकानदार, मॉल्स आणि खाजगी वाहतूक यांनी जर नियमांचा भंग केल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Parliament Winter Session 2021 | विरोधकांचा गदारोळ, राज्यसभेचंही कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब

धारावी पूरमुक्ती पोहोचली १९० कोटींवर, बीएमसीवर ९० कोटींचा अतिरिक्त भार