in ,

‘आरक्षणाचं राजकारण करून सत्तेचा मार्ग शोधत असाल तर…’ आमदार रोहित पवार यांचा भाजपला इशारा

ओबीसा समाजाच्या आरक्षणासाठी भाजपणे राज्यभरात चक्काजाम व जेल भरो आंदोलन केले. आरक्षण महाविकास आघाडीमुळेच गेले असा आरोप भाजपकडून होत असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत भाजपवर सडकून टिका केली आहे. रोहित पवार म्हणाले की, जाळपोळ करून मंडल आयोगाला विरोध करणारा भाजपा, जातनिहाय सामाजिक आर्थिक जनगणनेची आकडेवारी सात वर्षापासून दाबून ठेवणारा भाजपा राज्यात ओबीसी आरक्षण प्रश्नावरून आंदोलन करतोय याचं आश्चर्य वाटतं. हे आंदोलन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी की हुलकावणी देत असलेल्या सत्तेच्या हव्यासापोटी होत आहे असा प्रश्न होता, पण ‘मला सत्ता द्या चार महिन्यात आरक्षण पूर्वव्रत करून दाखवतो’, असं सांगत आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाने या प्रश्नांचंही उत्तर दिलं.

केंद्राकडून इंपिरिकल डाटा उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न चालूच आहेत. भारतीय जनता पक्षालाही ओबीसी समाजाप्रती खरी संवेदना असेल तर इंपिरिकल डाटा मिळवण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी करायला हवी. आज बेरोजगारी, महागाईने संपूर्ण युवावर्ग ग्रासला आहे, अशा स्थितीत आरक्षणांचे प्रश्न प्रलंबित राहून युवावर्गाला नुकसान सोसावे लागत असेल तसेच काही नेत्यांकडून राजकीय स्टंट करून युवा वर्गाचा राजकीय स्वार्थापोटी वापर होत असेल तर हे योग्य नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी एकत्र येऊन केंद्राकडे आग्रही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. आरक्षण प्रश्नांचं राजकारण करून कोणी सत्तेचा मार्ग शोधत असेल तर त्यांनाही हा युवावर्ग योग्य ती वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, याचा विसर मात्र कोणी पडू देऊ नये. असा इशाराही आमदार रोहीत पवारांनी भाजपला दिला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC Reservation | “ओबीसींचा काळवळा असेल.. तर प्रश्न कसा सोडवाल ते सांगा, सत्तेत येण्याची गरज नाही”

OBC Reservation | “आम्हाला मंत्री करायचं…मात्र अधिकार सर्व स्वत:कडेच ठेवायचे”, पटोलेंची खंत