in , , ,

मजूर-शेतकऱ्यांचे कल्याण करायचे असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल: नितीन गडकरी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज शनिवारी नगरमधील कार्यक्रमात एकाच मंचावर दिसले आहेत. पुणे आणि पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये गडकरी यांनी मोठ्या प्रकल्पांचा धडाका लावला आहे. बारामती मतदारसंघातील अनेक प्रकल्प जोरदारपणे सुरू आहेत. पालखी मार्ग, पुरंदर विमानतळ, पुण्याचा रिंग रोड या प्रकल्पांनी गती घेतली आहे. वेगाने काम करण्यासाठी आणि नवनवीन कल्पना राबवण्यासाठी ओळखले जातात. सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून गडकरींचे नेहमीच कौतुक होत असते. आजही शरद पवार यांनी नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे.

दरम्यान नितीन गडकरींनी चांगल्या रस्त्यांचे महत्त्व सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक वाक्य सांगितले. शिवाय, देशाच्या विकासात महत्त्वाच्या असलेल्या ४ गोष्टींपैकी रस्ते हा एक घटक असल्याचे देखील गडकरींनी यावेळी नमूद केले. पाणी, वीज, वाहतूक आणि संपर्क. देशात उद्योग आणायचे असतील, तर उद्योग सुरू व्हायच्या आधी उद्योजक या चार गोष्टी बघतो. उद्योग आला, तर भांडवली गुंतवणूक येते आणि त्यानंतर रोजगार उपलब्ध होतो. गरीबाला जात-धर्म नसतो. त्यामुळे देशातली गरिबी, बेरोजगारी दूर करायची असेल, मजूर-शेतकऱ्यांचे कल्याण करायचे असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल. त्यासाठी या ४ गोष्टींची व्यवस्था करावी लागेल”, असे गडकरी म्हणाले.

राज्यात मंत्री असताना तेव्हा माझे सचिव असलेल्या तांबेंनी मला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे एक प्रसिद्ध वाक्य सांगितले होते. ते वाक्य होते ‘अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झालेले नाहीत. अमेरिकेतले रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत झाली.” “राष्ट्रीय महामार्गातून सगळ्यात जास्त निधी नगर जिल्ह्याला मिळालाय असे मी ऐकले आहे. पण मी ज्या ज्या जिल्ह्यात जातो, तिथला खासदार हेच सांगत असतो. आणि ज्या राज्यात जातो, तिथला मुख्यमंत्री म्हणतो की सगळ्यात जास्त आम्हाला मिळालंय” असे देखील गडकरी यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

क्लीन-अप मार्शल्सवर महापौरांनी केले स्पष्ट…

काय आहे पाकीस्तानची नवीन चाल?