लोकशाही न्यूज नेटवर्क
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आणि त्यानंतर त्यांनी अन्य एका महिलेशी असलेल्या लिव्ह इन संबंधाबाबतची दिलेली कबुली यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाने थेट त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आंदोलनाचा इशारा दिला. या प्रकरणी मुंडे यांनी संवेदनशीलपणे राजीनामा द्यायला पाहिज. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. राज्याच्या राजकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे एका महिलेसोबत संबंध घेते हे पहिल्यांदाच समोर आले आहे. हे कुणी आरोप केले नाहीत, त्यांनीच मान्य केले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात देखील त्यांनी या दुसऱ्या महिलेची आणि त्यांच्या मुलाी माहिती दिलेली नाही. निवडणूक आयोग यावर नक्की कारवाई करेल, असा दावा त्यांनी केला. धनंजय मुंडे यांनी केलेली चूक कायद्याच्या चौकटीत बसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा पवार यांनी नेहमी नैतिकतेचे राजकारण केले आहे. त्यामुळे त्यांनीच राजीनामा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी, चंद्रकांत पाटील यांनी याबाबत ट्विट करून धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही, असे त्यांनी म्हटले होते. गेंड्याचे कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेचा राजीनामा घेतील असं वाटत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती.
Comments
0 comments