लोकशाही न्यूज नेटवर्क
पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होत असतानाच याच प्रकारचा मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्न सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला आहे. आज सकाळी जम्मूच्या बसस्थानकातून सुमारे ६.५ किलो आयईडी स्फोटक जप्त करण्यात आले.
स्फोटके बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात घेतल्यानंतर मोठा खुलासा झाला. संबंधित तरुण चंदीगडच्या नर्सिंगचा विद्यार्थी आहे. त्याला हा हल्ला करण्यासाठी पाकिस्तानातून संदेश मिळाल्याचे वृत्त आहे. स्फोटके सापडल्यानंतर जम्मू काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन हाती घेतले. तसेच संशयिताची चौकशी करण्यात आली.
दरम्यान, जम्मू झोनचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. मागील दोन दिवसांपासून आम्ही सतर्क होतो, असे ते म्हणाले. पुलवामाच्या पार्श्वभूमीवर काहीतरी घडणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. अशातच आम्ही चंदिगडच्या नर्सिंग विद्यार्थी सोहेलला अटक केली. त्याच्याकडून ६.५ किलो स्फोटके हस्तगत करण्यात आली. पंजाबमध्ये शिकणाऱ्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांचा वापर दहशतवादासाठी केला जात आहे, असे अधिकारी म्हणाले.
Comments
Loading…