in

Video; शेतकऱ्याच्या आयडियाची कल्पना; बनवले आधुनिक पद्धतीचे यंत्र

Share

शेतकरी स्मार्ट झालेत असं बोलायला आता हरकत नाही आहे.कारण आता असंख्य शेतकऱ्याचा आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती करण्याचा कल वाढला आहे. असच आधुनिक यंत्र बनवून सध्या उस्मानाबादचा शेतकरी शेती करत आहे. या आधुनिक शेतीमुळे बैलजोडीसह मजुरांची गरज हि भासत नाही तसेच पैसाही वाचतोय. त्यामुळे शेतकऱ्याचे हे आधुनिक यंत्र शेतकऱ्यासाठी दुवा ठरत आहे. या आधुनिक यंत्राची चर्चा जिल्हाभर पसरली असून शेतकऱ्याची प्रशंसा होत आहे.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील नव उद्योजक अशोक विठ्ठलराव काटे यांनी आपल्या भन्नाट कल्पनेतुन शेतकऱ्यांसाठी आधुनिक पध्दतीचे यंञ तयार केल आहे. त्यांनी चक्क बैलगाडीचे चाके काढून ट्रॅक्टरला लावली आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना कोळपणी व फवारणी करण्यासाठी एक सोप्पा पर्याय उपलब्ध करूण दिलाय.

संध्या बाजारात 18 एचपी ते 28 एचपीची छोटे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र त्यांची उंची आणि चाके बघता सोयाबीन सारख्या पिकांमध्ये आंतर मशागतीसाठी वापर करता येत नाही. यासाठी मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करण देखील शक्य नव्हतं. त्यासाठी काटे यांनी छोट्या ट्रॅक्टरचा वापर केला आणि त्याला बैलगाडीचे चाक व कोळपणी यंञ जोडून आधुनिक पध्दतीचे यंञ बनवले आहे. यामुळे आता शेती करणे सोपे झाले आहे.

ट्रॅक्टरला कोळपणी यंञ जोडल्याने सोयाबीन पिकांमध्ये उगवुन आल्यानंतर अगदी सहजच कोळपणी करता येते शिवाय फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरी द्यावी लागत होती, पाणी वाहुन न्यावे लागत होते, माञ या यंत्रणाने अगदी सहजपणे थोड्याच वेळात फरावणी प्रक्रिया पुर्ण होते तसेच पैसाही वाचतो व कोळपणी करण्यासाठी बैलजोडीची देखील आवश्यकता भासत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या आधुनिक यंत्राचा चांगला फायदा होणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Video;मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसला आग

‘हा’ जगप्रसिद्ध मिमर आहे नायजेरियाचा अभिनेता!