in

ICC चा मोठा निर्णय, क्रिकेट प्रेमींसाठी दुखाची बातमी

ICC Men's T20 World Cup 2020 postponed
ICC Men's T20 World Cup 2020 postponed
Share

या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये होणारे टी -२० विश्वचषक पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती आजच आयसीसीने जाहीर केली. स्थगितीच्या घोषणेमुळे आता बीसीसीआयलादेखील आयपीएलसंदर्भातल्या नियोजनाबद्दल निर्णय घेण्यास संधी मिळाली आहे. ICC T-20 चे सामने रद्द झाल्यानंतर आता IPL बद्दल काय निर्णय घेण्यात येईल, हे पाहाणे गरजेचे आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कोविड – 19 च्या साथीमुळे आम्ही हा निर्णय आम्ही घेत आहोत, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज स्पष्ट केले आहे. मागील दोन महिन्यांपासून टी -20 विश्वचषक स्पर्धेचे नियोजन करण्याचा निर्णय पुढे ढकलला जात आहे, ऑस्ट्रेलियातही दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे ही परिस्थिती विश्वचषकासाठी योग्य नाही. असंदेखील आयसीसीने व्यक्त केले आहे.

कोरोना संक्रमणाच्या बाबातीत ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्सही ही ठिकाणं फार पुढे आहेत. या शहरांत अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय, त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत 20-20 सामने खेळवणे म्हणजे खेळाडूंच्या जीवाशी खेळल्यासारखं होईल, असंही आयसीसीने नमुद केलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पवारांनी सकाळी मुंबईत; संध्याकाळी पुण्यात राहावं, पुण्याला हेडमास्तरची गरज… चंद्रकांत पाटलांचा सल्ला

Vaibhav Naik कोरोना पॉझिटिव्ह