in

IAS Sanjeev Jaiswal; महाराष्ट्रात आणखीन एक लेटर बॉम्ब; आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

चंद्रशेखर भांगे | महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने लेटर बॉम्ब टाकला आहे. या लेटरमध्ये काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

ठाणे महानगरपालिकाचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही गंभीर आरोप केले आहेत. जयस्वाल यांनी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी अनेक नागरिकांना ब्लॅकमेल केल्याचा व धमकावून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.

तसेच जयस्वाल यांनी बिल्डर सुरज परमार केसबाबत मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले चार आरोपी एनसीपी नगरसेवक नजीब मुल्ला, हनमंत जगदाळे, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसेचे माजी नेते सुधाकर चव्हाण सोबत संजय घाडीगांवकर गोल्डन गॅंग चालवत असल्याचा आरोपही केला आहे.

दरम्यान आपण ठाण्याचे आयुक्त असताना घाडीगावकर आपल्याला मानसिक त्रास देत होते. मला धमक्या देखील देत होते असं त्यांनी म्हटलं आहे. संजय घाडीगावकर यांच्या विरोधात सविस्तर क्रिमिनल चौकशी करावी अशी मागणी देखील जयस्वाल यांनी पत्रात केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’ लसीला अमेरिकेत परवानगी नाकारली

मालक रुग्णवाहिकेत, कुत्रा धावत थेट रुग्णालयात