in

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तायवाडे राजीनामा देणार

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देणार असल्याचे मोठ विधान केले आहे. उद्या संध्याकाळपर्यंत राज्यपालांकडे राजीनामा पाठवणार असल्याचं तायवाडे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पदावर राहून जर मला माझ्या ओबीसी समाजाला न्याय आरक्षण मिळवून देता येत नसेल तर पदारवर राहण्यात उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य बबनराव तायवाडे यांनी पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. मी येत्या 1 ते 2 दिवसात या पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आलो आहे. तत्वांशी तडजोड करू शकत नाही. त्यामुळे उद्या संध्याकाळीच मी राज्यपालांना राजीनामा पाठवणार आहे, असं तायवाडे यांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित

श्रीपाद छिंदमला पोलिसांकडून अटक