महाराष्ट्रातील प्रश्नावर संसदेत आवाज उठवल्याप्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी धमकावल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी सचिन वाझे प्रकरणाचा मुद्दा मांडला होता. तसेच या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली होती. दरम्यान शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या आवारात धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. (‘तू महाराष्ट्र में कैसे घुमती ही में देखता हू, और तेरे को भी जेल में डालेंगे) तू महाराष्ट्रात कशी फिरते मी बघतोच, आणि तुला पण तुरुंगात टाकेन, असा आरोप केला आहे.
या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसात सुद्धा राणा तक्रार करणार आहेत.
मी तिला धमकी का देऊ? त्यावेळी तेथे तिच्या जवळ काही लोक उपस्थित होती. मी तिला धमकी दिली की नाही ते ते सांगू शकतात.तिची बोलण्याची पद्धत आणि मुख्य भाषा चुकीची असल्याचे स्पष्टीकरण यावेळी अरविंद सावंत यांनी दिले.
भाजप खासदार रामा देवी यांनी या संदर्भात सांगितले की, नवनीत राणा माझ्याशी या प्रकरणाबद्दल बोलल्या. खासदार असताना अरविंद सावंत यांनी असे बोलू नये असे त्यांनी म्हटले. तसेच लोकसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे अशी मागणी यावेळी रामा देवी यांनी केली.
Comments
Loading…