in

विठुराया दिसला मला पीपीई किट घातलेला…अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची वारीवर भावनिक कविता

Share

कोरोना संकटामुळे यंदा महाराषट्रातील एक मोठा उत्सव आषाढी एकादशीचं स्वरूप यंदा खूपच वेगळं असणार आहे. दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने एकत्र येणारे वारकरी यंदा मात्र आपआपल्या गावीच वारी साजरी करणार आहेत.याच सगळ्या पार्श्वभूमीवर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक नवीन कविता केली आहे आणि त्याच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

संकर्षणने आषाढी एकादशीच्या निमित्त हा व्हिडिओ नुकताच त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केला. या व्हिडिओमध्ये संकर्षण वारी होत नसली तरी त्याला या कोरोनाच्या काळात विठ्ठल जिथे तिथे विविध रूपात दिसला आहे हे अगदी मार्मिक शब्दात मांडताना दिसतो. त्याने फारंच उत्तम शब्दात त्यांच्या भावना या कवितेत व्यक्त केल्या आहेत. तसंच त्याने विविध रूपातील विठ्ठलाबद्दल बोलत आपल्याला ही विचार करायला लावला आहे की खरंच देव सगळीकडे आहे.

संकर्षण त्याच्या कवितेत विठ्ठललाला प्रश्न विचारताना सुद्धा दिसला आहे. आपण कधी देव कसा आहे हे विचारत नाही पण संकर्षण हेच अधोरेखीत करत आपल्या या विठूरायाची विचारपूस करताना या व्हिडिओमध्ये दिसतो. त्याचा व्हिडिओ खूपच उत्तम जमून आला असून तो सध्या इंटरनेटवर जिथे तिथे शेअर होताना दिसत आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

‘BoycottNetflix’ होतय ट्रेन्ड; ‘या’ सिनेमामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

‘BollywoodKiHomeDelivery’ म्हणत अक्षय कुमार, आलिया भट्ट, अजय देवगणसह अनेक मोठ्या बॉलिवूड सिनेमांबाबत हॉटस्टारचा मोठा खुलासा