मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे नाव चर्चेत असून आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेंना तात्काळ अटक करण्याची मागणी विधानसभेत केली. या सर्व घडामोडींवर आज सचिन वाझे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकानं भरलेल्या गाडीचा मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या विषयावर विधानसभेत आज गदारोळ झाला. यावेळी फडणवीस यांनी मनसुख हिरेनच्या पत्नीचा जबाब विधानसभेत वाचून दाखवला. सचिन वाझे म्हणत होते जामीनावर मी तुला सोडवून घेतो. त्यानंतर ते तणावामध्ये होते. तीन दिवस ते सचिन वाझेकडे होते. त्यामुळे सचिन वाझेंना अटक करा अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.
या सर्व प्रकारावर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. मनसुख हिरेन प्रकरणात माझा संबध नाही. गाडी माझ्याकडे होती किंवा नव्हती यात आरोप काय आहे? असा सवाल त्यांनी केला. तसंच हिरेन यांच्या पत्नीने केलेल्या आरोप आपण वाचून त्यावर प्रतिक्रिया देऊ, असंही वाझे यांनी म्हटलंय.
NIA च्या टीमने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट
मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणात घडामोडींना वेग आला आहे. NIA च्या टीमने मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांची भेट घेतली. केस संदर्भात संपूर्ण माहिती घेतली, NIA टीम एंटीलिया वर ही गेली होती, तसेच टीमकडून रेतीबंदर खाडीची देखील पाहणी केली.
Comments
Loading…