in

मराठीत सांगितलेल कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू…रिंकुची कोरोनाबाबत ‘सैराट’ जनजागृती

Share

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक अभिनेता – अभिनेत्री सोशल मीडियावर जनजागृती करत आहेत.त्यात आता भर पडली आहे ती अभिनेत्री रिंकू राजगुरुची. रिंकुने आपल्या सैराट चित्रपटातील अभिनया सारखीच या व्हिडियोमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली आहे.असंख्य चाहत्यांना रींकुची ही जनजागृती आवडली आहे.

कोरोना व्हायरस पासून बचावासाठी आतापर्यंत असंख्य कलाकारांनी जनजागृती केली. मात्र नागरिक अद्यापही नियमांचे पालन करत नाही आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णाचा आकडा वाढलाय. त्यामुळे या नागरिकांना दम भरण्यासाठी रिकुने पुणे पोलिसांच्या सोबत मिळून एक व्हिडीओ बनवला आहे. या मध्ये मराठी आणि इंग्रजी मध्ये रिंकू सर्वांना मास्क घालण्याचा सल्ला देत आहे. पुणे पोलीस मुख्य आयुक्तांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव झाल्यापासून सोशल डिस्टंसिंग आणि मास्कच वापर बंधनकारक करण्यात आला आहे.त्यामुळे आपल्याला आपल्यासोबतच इतरांची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यामुळे या गोष्टींकडे चुकूनही कानाडोळा करू नका असे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Petrol and Diesel Prices Today : इंधन दरवाढ सुरूच; पाहा आजचे दर

कोरोनाचा कहरच; 11 हजार रुग्णांची केली हॅटट्रिक