in

सध्या मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही – नितीन गडकरी

Share

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रात मुंबई एक मुख्य हॉटस्पॉट असून सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण मुंबईत आहेत.

याशिवाय देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात असून ते पहिल्या क्रमांकावर आहे. एकूण मुंबईतील कोरोनारुग्ण संख्या ही ५९ हजार २०१ वर गेली आहे. तर मृतांची संख्या ही २२४८ वर आहे.

याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घडीला मुंबईला येण्याची हिंमत माझ्यात नाही असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

ते म्हणाले की, सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता मुंबईत येण्याची हिंमत माझ्यात नाही. पण ही परिस्थिती नक्की बदलेल असा मला विश्वास आहे,” असे ते लघुउद्योग तसंच पायाभूत सुविधा कशा पद्दतीने विकासाचा पाया रचण्यात महत्त्वाची भूमिका निभाऊ शकतात यावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मोदी जॅकेटनंतर बाजारात ‘या’ मोदी मॉडेलची हवा….

‘सुशांत सिंह राजपूत आत्महत्या करु शकतो, तर मी का नाही’, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या