in

शिये गावातील भूखंड माफिया व भ्रष्ट वन अधिकाऱ्यांच्या विरोधात आमरण उपोषण

करवीर तालुक्यातील शिये गावातील सर्वे नंबर 187 मध्ये पारंपारिक जंगल ही वन विभागाची जमीन असून या जमिनीवर काही राजकीय लोकांनी वन अधिकाऱ्यांशी आर्थिक देवघेव करून अतिक्रमण केले आहे. यापूर्वी वारंवार निवेदन देऊनही हे अतिक्रमण हटवलं असल्याच्या निषेधार्थ शिये गावातील सामाजिक कार्यकर्ते अमोल हंबीरराव शिंदे यांनी उप वनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग यांच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे.

दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी आत्मदहन करणार असल्याचा इशारा अमोल शिंदे यांनी दिला आहे. शिये गावातील सर्वे नंबर 187 हे पारंपारिक जंगलही वन विभागाची जमीन असून या जमिनीवर काही राजकीय लोकांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत आपण वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करून पुरावे देखील सादर केले आहेत. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर वनविभागाच्या ताराबाई पार्क घेतल्या कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे, असे ते म्हणाले. शिये गावातील वन जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ काढावे व निद्रीस्त व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ती तात्काळ कारवाई केली जावी या मागण्या आमरण उपोषणादरम्यान करण्यात आल्या आहेत. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, महसूल विभागप्रधान मुख्य वनसंरक्षक यांना दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापुरात डेल्टाचे सात रुग्ण सापडल्याने खळबळ, सतेज पाटलांची माहिती

Afghanistan Taliban War । अफगाणिस्तानात अडकलेले भारतीय मायदेशात; सी -17 ग्लोबमास्टर विमान परतलं