in

दूषित पाण्यामुळे शेकडो माशांचा मृत्यू ; नागपूरच्या गांधीसागर तलावांमधून फेकले पाच टन मासे

Hundreds of fish die due to contaminated water; Five tons of fish thrown from Nagpur's Gandhisagar lakes
Hundreds of fish die due to contaminated water; Five tons of fish thrown from Nagpur's Gandhisagar lakes
Share

नागपूर – नागपूरच्या गांधीसागर तलावामध्ये शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाल्यामुळे तलावात कचऱ्याचं प्रमाण वाढले. परिणामी ऑक्सिजनचं ही प्रमाण कमी झालंय. त्यामुळं माशांचा मृत्यु होत असल्याची शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत या तलावातून चार ते पाच टन मासे पाण्यातून काढले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर मध्ये झालेल्या पावसामुळे या तलावाची पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे. मात्र आता अजून एका गोष्टीसाठी या तलावाकडे सगळ्यांचे लक्ष जात आहे ते म्हणजे इथून जाताना एक कमालीचे दुर्गंध सगळ्यांना येते. त्याचं कारण म्हणजे काठावरती शेकडो मासे मरून पडलेल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळेच महानगरपालिकेचे कर्मचारी तलावाजवळ पोचले आणि हे मासे काढण्यास लागले.


काठावरती इतक्या मोठ्या प्रमाणात मासे म्हणून पडल्यामुळे महानगरपालिकेला सूचना देण्यात आली आणि महानगरपालिकेने तातडीने कर्मचारी पाठवत त्याला स्वच्छ करण्याची मोहीम सुरू केली. कारण या तलावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा जमा झाला होता. त्यामुळे मासे मेले असावी अशी शक्यता नाकारता येत नाही असे महापालिका कर्मचारीकडून सांगण्यात आले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Dumper hits private bus; 15 passengers injured in bus

डंपरची खासगी बसला धडक ; बसमधील १५ प्रवासी जखमी

Deprived kindergarteners celebrate "health" curd

वंचित बालगोपाळांनी साजरी केली ”आरोग्याची” दहीहंडी